दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना किमान पंधरा टक्के बोनस देण्याची मागणी लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. यासाठी जिल्हा यंत्रमाग धारक संघ कार्यालयासमोर दोन यंत्रमाग कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. शनिवारी यंत्रमाग कामगार लक्ष्मण माळी तसेच शहाबुद्दीन शेख यांनी उपोषणाला सुरूवात केली.कामगारांच्या बोनससाठी लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनने मागच्या आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले. यंत्रमाग कारखानदार, कामगार संघटना प्रतिनिधी तसेच कामगार आयुक्तांची बैठक घेऊन पंधरा टक्के बोनस तोडगा काढण्याची विनंती सिटूने केली होती. याबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे, प्रशासन तसेच यंत्रमाग कारखानदार विरोधात आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती सिटूचे ॲड. अनिल वासम यांनी दिली.
Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी
छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...