देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या वीरांना श्रध्दांजली अपर्ण करण्याच्या उद्देशाने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश, मिटटी को नमन, वीरो को वंदन हे अभियान जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून “सेल्फी विथ मेरी माटी” अभियान राबविले या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विश्वविक्रम अभियान प्रमाणपत्र वितरण सोहळा पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान असलाच पाहिजे.
बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने
गेल्या एक ते दीड महीन्यापासून “सेल्फी विथ मेरी माटी” राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थानी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी हे अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे. ही अभिमानाची बाब आहे
या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा राज्य संपर्क कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१.०० वाजता सर कावसजी जहांगीर दिक्षांत सभागृह,येथे संपन्न होणार आहे.