अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू सांगत त्याची तुलना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसोबत केली जाते. सिनेइंडस्ट्रीच्या होणाऱ्या तुलनेवर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने भाष्य केले आहे. प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचा चाहता वर्ग वेगळा आहे त्यामुळे तुलना करणं चुकीचे असल्याचे सिद्धार्थ जाधवने म्हटले.
मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवून सोडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने अल्पावधीत बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली छोटीशी भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची बॉलिवूड आणि विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटासोबत तुलना केली जाते. अशा प्रकारे सगळ्याच सिनेइंडस्ट्रीची तुलना चुकीचे असल्याचे सिद्धार्थ जाधवने म्हटले.सिद्धार्थ जाधवने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कनन यांना युट्युबवर मुलाखत दिली होती. यावेळी सिद्धार्थने वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने मराठी चित्रपटसृष्टीची दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसोबत होणाऱ्या तुलनेबाबतही भाष्य केले. सिद्धार्थ जाधवने म्हटले की, 3-4 चित्रपट चालले. त्यानंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपट आले. पण, ते फारसे चालले नाहीत. एखाद दोन चित्रपटांना यश मिळाले की त्या आधारे मराठी सिनेइंडस्ट्री अथवा इतरांशी तुलना करणे चुकीचे असल्याचे सिद्धार्थने म्हटले.
सिद्धार्थ जाधवने म्हटले की, देश पातळीवर मराठी चित्रपटांची चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटांची स्पर्धा ही इतर सिनेइंडस्ट्रीसोबत नाही. हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची मराठीची स्पर्धा नाही. मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जात आहे. त्याचे कौतुक होत आहे. हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री एका कुटुंबासारखी आहे. त्यामुळे या सिनेइंडस्ट्रीची तुलना चुकीची असल्याचे मत सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले. प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचा चाहता वर्ग वेगळा आहे. या प्रेक्षक वर्गाची आवड वेगवेगळी आहे. त्यामुळे तुलना करणं चुकीचं असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले