सध्या इन्स्टाग्राम नवीन ब्रँडच्या रूपात समोर येत आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियाच्या दमदार प्रभावामुळे ‘रील’ हिरोंचा सर्वत्र डंका आहे. एका रात्रीत ‘स्टार’ बनविण्याची किमया सोशल मीडियात आहे.आज कानाकोपऱ्यातला ‘रील हिरो’ आपल्या युनिक कंटेटनं जगाला डोक्यावर घेतोय.
याचाच प्रत्यय सोलापुरात आला आहे.सोलापुरातील एका रील्स स्टारने १० हजार फॉलोअर्स पूर्ण झाल्याने फॉलोवर्सचे आभार मानण्यासाठी चक्क भर चौकात बॅनर लावला आहे.रील्स स्टार शिवा केंगार पाच ते सहा महिन्यात सोलापुरी लेझीम, विनोदाचे रील्स बनविले आहेत यामध्ये त्याला मिलीयन व्हिव आणि १० हजार फॉलोअर्स मिळाले आहेत. याचे यश म्हणून आपल्या फॉलोअर्सचे आभार मानन्यासाठी त्याने वडिलांनी मित्रांच्या साह्याने भर चौकात बॅनर लावले आहे. सर्वत्र या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे.