Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजेवाडी तलाव, सातारा कडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरु ?

तरुण भारतbyतरुण भारत
October 21, 2025
in maharashtra, solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


आटपाडी – राजेवाडी तलाव सांगली सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याच्या सुचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिलेल्या असतानाही, राजेवाडी तलावाचे, सातारा सिंचन मंडळाकडे हस्तांतरण करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू असल्याचे समजले आहे . या प्रक्रियेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यावर पुन्हा होणारा अन्याय सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी हाणून पाडावा. असे आवाहन आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केले आहे .
           

११ जुन २०२५ रोजी जलसंपदा मंत्री विखे – पाटील सांगली येथे आढावा बैठकीसाठी आले असता खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी, राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याची मागणी केली होती . त्यावेळी राजेवाडी तलाव सांगली सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याच्या सुचना मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी, अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मंत्री महोदयांच्या सुचनेवरून सांगली जिल्ह्यात आणि विशेष करून आटपाडी तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता . याला ४ महिने होऊन गेले . तथापि राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हायचे दुरच, आता या राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन सातारा येथे नेण्याच्या शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजले आहे . हे धक्कादायक आहे .
           

आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावात तलावाचा मुख्य भरावा आणि पाणी साठप्याचा काही भाग येत असताना राजेवाडी पासून २५ किमी दूरवर असलेल्या म्हसवड शहराचे नाव या तलावाला दिले गेले आहे . हे मुळातच अन्यायी होते व आहे . १८८० साली निर्माण झालेल्या ३ टीएमसी क्षमतेच्या म्हसवड ( राजेवाडी ) तलावाचे मुख्य व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावे. पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे कार्यान्वीत व्हावे आणि महुद येथील शाखा कार्यालया बरोबरच राजेवाडी येथेही शाखा कार्यालय व्हावे . यासह अन्य काही मागण्यांच्या अनुषंगाने अनेक वर्षापासून मागणी केली जात असून गत वर्षभरापासून आपण जोरदार आवाज उठविला आहे .
           

सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे विद्यमान १४ आमदार महोदय, ६ खासदार महोदय, ६ माजी आमदार महोदय आणि अन्य ४ मान्यवरांनी अशा एकुण ३० मान्यवर महोदयांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहून त्यांचे लक्ष वेधले होते .
           

माण ( सातारा ), आटपाडी ( सांगली ) आणि सांगोला ( सोलापूर ) तालुक्यांना राजेवाडी तलावाचे पाणी मिळते . तथापि सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ . बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील या मान्यवरांनी आणि आटपाडी तालुक्यातील विविध पक्षाच्या मान्यवरांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावी अशी मागणी खास पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे . आमदार सदाभाऊ खोत यांच्या दि . ७ एप्रील २०२५  पत्रावर मुख्यमंत्री महोदयांनी, तपासून कार्यवाही करावी . असा आदेश जलसंपदाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना, ई . ऑफीस क्र . ८२३९७२८ दि . २३ एप्रील २०२५ रोजी दिले आहेत .
           

राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन सातारा येथे, उपविभागीय कार्यालय दहिवडी येथे आणि शाखा कार्यालय महुद बरोबर म्हसवड येथे करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे कळल्याचे सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
           

आटपाडी तालुक्याच्या उशाला असलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी, संपूर्ण आटपाडी तालुक्याला न मिळाल्यानेच हजारो कुटूंबांना स्थलांतर करावे लागले आहे . याशिवाय पाच सहा पिढ्यांचे गत १४० वर्षात अतोनात नुकसान झाले आहे . याकडेही सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले .

Post Views: 48
Previous Post

दिवाळी निमित्त सोलापूर पुणे महामार्गावर जादा एसटी बसेसचे नियोजन, बसस्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी

Next Post

महाज्योतीच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाज्योतीच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

सांगोल्यात जनगणनेदरम्यान शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू #marathinews

May 26, 2026

इंधनदरवाढी विरोध आणि कांद्याचे घसरलेले दर यासाठी केले आंदोलन #viral #maharashtranews

May 26, 2026

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026
अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880259

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697