आज दि. 20/01/2023 रोजी पहाटे 6 वा. इंदापूरमध्ये गायी व बैलांची कत्तल करून ते गोमांस एका स्कोडा कार क्र. MH12 DY 4357 मध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली…शिवशंकर स्वामींनी सदर गाडी भिगवण येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतली…त्यावेळी भिगवण पोलिसांसमोर त्या स्कोडा गाडीच्या चालकाने हे गोमांस इंदापूरमध्ये गायी व बैल कापून पुण्यात घेऊन चाललो आहे असे कबुल केले व इंदापूरमध्ये आत्ताही कत्तल चालू असल्याचे सांगितले. त्यावेळी स्वामींनी ही माहिती वरीष्ठ पोलिस अधिकार्यांना सांगताच वरीष्ठ अधिकार्यांनी इंदापूर कसाई मोहल्ल्यात पोलिस पथके रवाना केली…पोलिस येत असल्याची चाहूल लागताच कसायानी गोमांसाची पळवापळव चालू केली…तरीही पोलिसांना गोमांसाने गच्च भरलेले दोन टेम्पो टाटा 407 क्र. MH16 Q 7393 व अशोक लेलॅण्ड क्र. MH12 SX 7375 मिळून आले…पोलिसांनी संबधित इसमांना ताब्यात घेत सर्व गोमांस व वाहने जप्त केली व संबधित इसमांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे..!
महत्त्वाचे म्हणजे मागील महिन्यातच इंदापूर नगरपालिकेने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त केले होते पण काही समाजकंटक जाणूनबुजून पुण्यश्लोक श्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाचे पावित्र्य दुषित करण्याच काम करत आहेत…मुद्दामून हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचे काम ही नराधम लोक करत आहेत…ह्यावर पोलिस प्रशासन व इंदापूर नगरपालिका यांनी योग्य तो कायदेशीर आळा घालत बेकायदेशीरपणे होत असलेली गोवंशहत्या थांबवावी अन्यथा इंदापूरमध्ये हजारोंच्या संख्येने ह्या समाजविरोधी वृत्तीविरोधात आंदोलन घेण्यात येईल अशी माहिती शिवशंकर स्वामी यांनी दिली.
या कारवाईत प्रतीक भेगडे , अभिषेक कडूस्कर , अक्षय खोले , शुभम वाडेकर इ गोरक्षकानी सहभाग घेतला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...