पंढरपूर – शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांचा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आढावा घेऊन मागील काही दिवसांपासून प्रभागात विकास कामांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे.
रविवार (दि.२२) प्रभाग क्रमांक १७ संतपेठ परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन मनसे नेते दिलीप धोत्रे, नगराध्यक्षा प्रणिता भालके, समाजसेवक नागेश यादव यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी नगरसेवक लोकेश यादव,समाजसेवक बाबा चव्हाण,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, दत्ता थोरात, संतोष वाघमारे, लक्ष्मण रणदिवे, तेजस जाधव, योगेश रणदिवे, तुषार करजीगीकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत संतपेठ परिसरातील बहुचर्चित असलेला प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने प्रभागातील जनतेचा विश्वास कायम ठेवत धोत्रे यांनी अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी उघडण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन विकास कामांचा धडाका सुरू केला आहे.
याचबरोबर महापुरुषांच्या जयंती निमित्त राज्यातील नावाजलेल्या कलाकारांच्या उपस्थितीत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून लोककलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

















