सदरील पीकअप हा कर्नाटक हून अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याच्या दिशेने निघाला होता. या वाहनात अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंप या ठिकाणी बुधवारी (दि. 29) रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानुसार प्रकाश कुशान हेगरे (वय 26, रा. कोकटनूर, ता. अथनी, जि. बेळगाव) व मल्लू जयश्री मेलगडे (वय 18, रा. अर्जुनगी, ता. बबलेश्वर, जिल्हा, विजापूर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा. द. वी कलम 328,188, 34 यांसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो. ह सुनील बालगुडे,पो. शि. विकास राखुंडे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि नागनाथ पाटील करीत आहेत.