महावितरणतर्फे सेवा सेवा सप्ताहांतर्गत उद्योगांच्या तक्रारींचे निरसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून उद्योगांना नियमित व विनाखंडित वीजपुरवठा करण्यावर भर देण्यात येईल,असे अभिवाचन महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक वाडे यांनी आयमात आयोजित कार्यक्रमाचे वेळी दिले. यावेळी उद्योजकांच्या अनेक तक्रारीं जागीच मार्गी लावण्यात आल्या.
यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,कुंदन डरंगे,आयमा उर्जा समितीचे चेअरमन रवींद्र झोपे, महावितरणचे पाटील व अंबड चे सहाय्यक अभियंता गणेश कुशारे आदी होते.यावेळी अंबड औद्योगिक वसाहतीत महावितरणबाबत उद्भवत असलेल्या विविध समस्यांची सविस्तर माहिती आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही निदशंनास आणले. उद्योजकांनीही आपल्या विविध मागण्या सादर केल्या. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनेक तक्रारींच्या जागीच निपटारा करून आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवली.