पालम – गोदावरी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने एक जनाचा बुडून अंत तर दुसऱ्याचा गावी परत येताना अपघात होऊन जागेवरच मृत्यू. अशा दोन घटनेत दोन दिवसात दोन सख्खे चुलत भावांन वर काळाने घाला घालून हिरावुन घेतलेआहे. या घटनेने पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा पसरली असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नियतीच्या या फेऱ्याने दुधाटे परिवारातले दोन कर्ते कुटुंब प्रमुख हिरावून नेले आहेत.
28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शेतातील काम उरकून आल्यानंतर राजकुमार तुकाराम दुधाटे वय 28 वर्ष हा गोदावरी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. 3 दिवस शोध घेतल्या नंतर 30 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता राजकुमार दुधाटे यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यावर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखातून सावरतो न सावरताच त्यांचा लहान व सख्खा चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे वय 25 वर्ष यांच्या अपघाताची बातमी 1 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गावात धडकली. पालम ते लोहा या राष्ट्रीय मार्गावर वाहनाच्या धडकेत जागेवरच नितीनचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनेने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन सख्या चुलत भावाचा दोन दिवसात असा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून चार दिवसापासून गावात चूल पेटली नाही. दोघेही कुटुंबात कर्ते प्रमुख व एकुलते एक होते. हा आघात पचविणे सर्वानाच अवघड जात आहे. 2 मे रोजी दुपारी 12 वाजता गोदाकाठावर स्मशानभूमीत नितीन दुधाटे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले आहेत.