औरंगाबाद जळगाव महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो अजिंठा पोलिसांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास अजिंठा निकट सापळा रचून पकडला असून आयशर मध्ये असलेला सुमारे २०लाखाचा गुटख्यासह १५लाखाचा आयशर टेम्पो असा एकूण सुमारे ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी नुकताच अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अवैध्य धंद्या विरुध्द मोठी कार्यवाही केल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
औरंगाबाद जळगाव महामार्गावरून चार चाकी वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार,सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे,उपनिरीक्षक राजू राठोड, पोहेकॉ अक्रम पठाण,संजय कोळी,विकास चौधरी,अरुण गाडेकर,निलेश शिरस्कर,प्रभाकर जाधव आदींनी अजिंठा गावा निकट असलेल्या हॉटेल आशिर्वाद जवळ रात्रीच्या सुमारास सापळा रचला असता महामार्गावरून सुमारे १०वाजेच्या सुमारास जात असलेला एम एच २१ बीच ४७३५ या क्रमाकच्या आयशर टेम्पो अडवून पाहणी केली असता त्यात विमल,आर एम डी, पान पराग,आदी सुमारे १९लाख ८६ हजार ८०० रुपयाचा गुटखा आढळून आला आहे.
गुटखासह १५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेऊन चालक गजानन अंबादास लोखंडे रा.तपोवन ता.भोकरदन,जिल्हा जालना,अण्णा गजानन जगताप रा.राजूर ता.भोकरदन,अमोल प्रभाकर तुपे रा.उंबरखेडा ता.भोकरदन या तिघांन विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहे.