मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे कबड्डी खेळत असतानाच २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मालाड इथल्या महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. किर्तिकराज मल्लन (२०)असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो बीकॉमचा विद्यार्थी आहे. या घटनेनंतर त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्तिक दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत होता. कार्तिकला मित्तल विद्यालयाच्यावतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिक राज या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
कबड्डी खेळताना आऊट होऊन फिरताच खाली कोसळला, मालाडमध्ये तरुणाचा मृत्यू; घटनेचा Live Video समोर pic.twitter.com/eN8Dx2yHOX
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) February 10, 2023