कृषि क्षेत्रातून देशाला १८ टक्के जीडीपी मिळतो व राहिलेला ८२ टक्के जीडीपी.हा इतर क्षेत्रातून मिळतो.या १८ टक्के जीडीपी कृषि व कृषिवर अवलंबुन असलेल्या ५० टक्के लोकसंख्येतून मिळतो.या अनुषंगाने कृषि क्षेत्रात उद्योजकतेला मोठी संधी आहे.आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे.एखादे कृषि उत्पादनाची आपण निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होतात व त्या कृषि उत्पादनाचे भाव गगनाला भिड तात.आपल्या देशाची कृषि परंपरा ही अकरा हजार वर्षापूर्वीची आहे.आपला कृषिचा पाया भक्कम आहे.त्यादृष्टीने आपला कृृषिचा पाया भक्कम असून त्याला नविन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृषि उद्योजकतेची साथ मिळाली तर कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु शकतो असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषि अनु संधान परिषदेचे महासंचालक डॉ.हिमांशू पाठक यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उदयोन्मुख उद्योज कां साठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सचिव तथा महासंचालक डॉ.हिमांशू पाठक बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापी ठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील होते.यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि.विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील म्हणाले या कृषि विद्यापीठाने अनेक उद्योजक घडविले आहेत.यामध्ये विलास शिंदे सारखे कृषि उद्योजक वीस हजारच्यावर शेत कर्यांपर्यंत पोहचले आहेत.यशस्वी कृषि उद्योजक बनायचे असेल तर शेतीवरील निष्ठा,कर्तव्य दक्षता व अद्ययावत तंत्रज्ञाना ची आवश्यकता असते.शेतकर्यांना शेतीतून समृध्द करायचे असेल तर त्यांना शेतीमधील नविन विवि धतेचे पर्याय देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ.पाटील यांनी केले.
उद्योजक श्री विलास शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले जगातील तरुण वर्ग शेतीपासून दुर जात आहे.याचे कारण म्हणजे इतर क्षेत्रात सुरक्षीतता जास्त असून शेतीमध्ये सुरक्षीतता कमी आहे.यशस्वी कृषि उद्योजक तेव्हाच बनु शकतो जेव्हा आपत्तीला इष्टआपत्ती समजून त्यातून मार्ग काढतो.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सुनील गोरंटीवार यांनी केले.मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रक्षेत्राला भेट देऊन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल लायसीमीटर उपकरणाची तसेच ड्रोनद्वारे औषध फवारणीची पाहणी केली.यावेळी मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रयोगशाळेला भेट देवून कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे विकसीत केलेले आयओटी तंत्रज्ञान,रोबोटीक्स तंत्रज्ञान,ड्रोन तंत्रज्ञान जाणून घेतले.