पालम तालुक्यातील रावराजुर येथून गंगाखेड कडे दुचाकी वरून निघालेल्या शिवाजी किशनराव शिंदे वय वर्ष 70 व श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय वर्ष 19 राहणार रावराजुर तालुका पालम हे दोघेजण आपल्या गावाकडून गंगाखेड कडे निघाले असता गंगाखेड जवळील मालेवाडी पाठी जवळ सकाळी 9 30 वाजता बस व मोटार सायकलचा मोठा अपघात झाला त्यात मोटर सायकल वरील आजोबा व नातू हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत.
रावराजुर येथील शिवाजी किशनराव शिंदे व श्रीनिवास कल्याण शिंदे हे दुचाकीवरूनगंगाखेड कडे निघाले असता दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कळंब कडून नांदेड कडे जाणारी बस मालेवाडी पाटील जवळ आली असता दुचाकी व बसचा भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातामध्ये आजोबा शिवाजीराव किशनराव शिंदे 65 वर्ष व नातू श्रीनिवास कल्यानराव शिंदे 19 वर्षे हे या अपघातात जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी ही माहीती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मयत व्यक्तींना तात्काळ अंबुलन्स बोलावून त्याच्य साह्याने मयतास गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.