मुसळधार पावासामुळे मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झालीय. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थानच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गुजरातमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भरुचसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे हजारो नागरिकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. खबरदारी म्हणून येथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. गोध्रा-रतलाम मार्गावरील अमरगड पंच पिपलिया येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. याचा परिमाण दिल्ली, राजस्थान प्रवासावर झाला आहे. या सोबतच महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्स्प्रेससह एकूण 19 रेल्वेगाड्यांच्या खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गिकांवरून पाणी वाहत असल्याने नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पावसामुळे रद्द झालेल्या गाड्यांची यादी
22930 वडोदरा-डहाणू रोड जेसीओ , 22929 डहाणू रोड- वडोदरा जेसीओ , 09156 वडोदरा सुरत जेसीओ, 09155 सुरत – वडोदरा जेसीओ , 09318 आनंद वडोदरा जेसीओ , 22953 मुंबई -अहमदाबाद जेसीओ , 22954 अहमदाबाद – मुंबई जेसीओ , 20901 मुंबई-गांधीनगर वंदे भारत जेसीओ , 20902 गांधीनगर-मुंबई वंदे भारत जेसीओ , 12009 मुंबई -अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस I जेसीओ, 12010 अहमदाबाद -मुंबई जेसीओ, 19015 दादर – पोरबंदर जेसीओ , 12925 बांद्रा टी-अमृतसर जेसीओ ,12931 मुंबई-अहमदाबाद जेसीओ , 12932 अहमदाबाद – मुंबई जेसीओ ,12933 मुंबई – अहमदाबाद जेसीओ ,12934 अहमदाबाद -मुंबई जेसीओ ,82902 अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस जेसीओ ,82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस जेसीओ ,12471 बांद्रा टर्मिनस-श्री मारा वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस , 09172 भरुच-सुरत जेसीओ , 04711 बिकानेर-बांद्रा जेसीओ .