गोरक्षकांवर नांदेड जिल्ह्यातील कसायांकडून गोरक्षकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यु झाला व त्याच्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी केले गेले. गोवंशहत्याबंदी कायदा पायदळी तुडवणाऱ्या गोमाफियांवर योग्य अशी कायदेशीर कारवाई करून संपूर्ण महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पुणे येथे प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिले.
निवेदनातील महत्वाचे मुद्दे –
1) नांदेडमधील ह्या गंभीर गुन्ह्याची विशेष पथक स्थापन करून ” SIT ” मार्फत चौकशी करण्यात यावी.
2) नांदेडमधील मृत्युमुखी पडलेल्या व त्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरक्षकांच्या कुटुंबापर्यंत सरकारतर्फे तातडीने आर्थिक मदत देणेत यावी. तसेच हॉस्पिटलचा खर्च प्रशासनातर्फे करण्यात यावा.
3) संपुर्ण महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असताना देखील बेकायदेशीरपणे खूप मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल चालू आहे. ह्यावर त्या त्या ठिकाणचे स्थानिक पोलिस प्रशासन गोवंशहत्याबंदीची कडक अंमलबजावणी करत नाहीत. गोरक्षक रस्तावर उतरला तरच गोवंशाचे प्राण वाचतात. ह्या अश्या घटना वारंवार घडू नये म्हणुन ज्याप्रमाणे इतकं कलम 353 हे सेशन कमेट केलं त्याच पद्धतीने गोवंशहत्याबंदी कायदा सेशन कमिटी करण्यात यावा.
4) संपुर्ण महाराष्ट्रात तालुकानिहाय पोलिसांचे गोवंश सुरक्षा पथक नेमण्यात यावे.
— ह्या अतिगंभीर गोष्टीवर योग्य ती कडक कायदेशीर करण्यात येईल असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सकल हिंदु समाजाला दिले..!
यावेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने शिवशंकर राजेंद्र स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) , राजेंद्र परीलाल गावडे ( हिंदु जागरण मंच ,पुणे ) , महेश शांताराम पवळे ( राजे शिवराय प्रतिष्ठान ) किशोर अरुण चव्हाण ( विश्व हिंदू परिषद ) निलेश रमेश भिसे ( शिवसमर्थ प्रतिष्ठान ) धनंजय मारुती गायकवाड ( पुण्यश्वर पुरनिर्माण समिती ) सोमनाथ बाळासाहेब भोसले ( सकल मराठा समाज ) धीरज रामचंद्र घाटे ( हिंदुगर्जना प्रतिष्ठान ) अनिरुद्ध श्रीकृष्ण बनसोड ( आपत्कालीन गोसेवा संघ ) दीपक बाबूलाल नागपुरे( सकल हिंदु समाज समन्वयक ) आशिष काटे ( श्रीरामराज्य प्रतिष्ठान ) स्वप्निल नाईक ( पतित पावन संघटना ) इ. उपस्तिथ होते.
आपला नम्र –
सकल हिंदू समाज पुणे.