औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने नळदुर्ग शहरात शिवसेना व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व साखर वाटुन आनंदोत्सव साजरा केला.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण व्हावे ही हिंदु बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासुनची मागणी होती. ही मागणी दि.२४ फेब्रुवारी रोजी पुर्ण झाल्याने या दोन्ही जिल्ह्यात हिंदु बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. दि.२४ फेब्रुवारी रोजी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे वृत्त समजताच नळदुर्ग शहरात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्या नेतृत्वाखाली भाजप–शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील होळकर चौकात फटाक्यांची आतषबाजी करून व नागरीकांना साखर वाटुन एकच जल्लोष केला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहर प्रमुख पद्माकर घोडके, सागर हजारे,शिवाजी सुरवसे, विशाल डुकरे, गजानन हळदे,अजय ठाकुर, मनोज मिश्रा, किरण दुस्सा यांच्यासह भाजप–सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ज्ञानेश्वर घोडके यांनी म्हटले की सध्या केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार अस्तित्वात आहे याचाच परीणाम म्हणुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले असल्याचे म्हटले आहे.