भारतातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पाहायला मिळत आहे. थंडीच्या लाटेमुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. थंडीचा कहर फक्त भारतातच नाही. तर अमेरिकेतही कडाक्याची थंडी पडली आहे. नाताळच्या दिवशी अमेरिकेमध्ये हिमवादळ धडकले. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. यामुळे अमेरिकेतील अनेक भाग गोठले. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. जागोजागी अनेक फूट उंच बर्फाचे डोंगर पाहायला मिळत आहेत. यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अमेरिकेतील तापमान मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठला आहे. अमेरिकेतील तापमान शून्याखाली मायनिस डिग्रीवर पोहोचले आहे. यामुळे जगप्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठला आहे. नायगारा धबधबा गोठल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा धबधबा जणू आर्क्टिक खंडाचा भाग दिसत आहे, पाणी गोठल्यामुळे येथे फक्त पांरा शुभ्र बर्फ दिसत आहे. अमेरिकेली हिमवादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...