दशक्रिया विधीच्या स्वयंपाकासाठी शेजारच्यांनी दिलेल्या घरात स्वयंपाक सुरु असतांना गॅसगळती होऊन आग लागल्याने कांचननगरातील सुभाष भाऊलाल बाविस्कर यांच्या घराची राखरांगोळी झाली. यात घरातील संपूर्ण वस्तू जाळून खाक झाल्या आहे.
सुभाष बाविस्कर यांच्या शेजारी राहणाऱ्या वृद्धाचे निधन झाले. या वृद्धाचा दशक्रिया विधी होता. या कार्यक्रमाचा स्वयंपाक करण्यासाठी बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांनी दिली होती. येथे स्वयंपाक सुरु असतांना गॅसगळती होऊन काही क्षणातच भीषण आग लागली. यात घरातील सर्व कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले व संसार उघड्यावर आला. आजूबाजूला नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली व नागरिकांनी आपापल्या पद्धतीने पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढी भीषण होती की, ती आटोक्यात आली नाही. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब येईपर्यंत आगीत संपूर्ण घर खाक झाले, असे घरमालकाने सांगितले. हलाखीची परिस्थिती असून ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले. मदत मिळण्याची मागणी केली आहे.