पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गज दिनानिमित्त हत्तींच्या संरक्षणाप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “जागतिक गज दिनाच्या निमित्ताने आपण भारताच्या समृद्ध नैसर्गिक वारशाशी घट्ट जोडल्या गेलेल्या हत्तींच्या संरक्षणाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे देखील मी कौतुक करतो. मुदुमलाई व्याघ्र अभयारण्याला मी अलिकडेच भेट दिली होती त्याची झलक सामायिक करत आहे.”
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...