जालना येथील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ (बक्कल नंबर 557) आज मुलासह स्कुटीवरून भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर या त्यांच्या मूळगावाहून जालन्याकडे येत होत्या. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याच्या स्कुटीचा आणि बैलगाडीचा राजूरजवळ भीषण अपघात झाला.या अपघातात सुनीता ढोबाळ जागीच मृत्युमुखी पडल्या. तर दुचाकी चालवित असलेला त्यांचा मुलगा रोहन (वय 18) गंभीर जखमी झाला आहे.श्रीमती ढोबाळ या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकम्पा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या.त्यांच्या मृतदेहाची राजुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी सुरू आहे. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी बातमी धडकताच संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक करण्यात येत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...