Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित…!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 10, 2023
in marathwada
0
जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित…!
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे.

राज्य शासनाच्या वतीने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.

अशी आहे जालना शहराची ओळख… 

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो.

राज्यातील एकूण महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका (PMC), नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार शहर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अकोला महानगरपालिका ,उल्हासनगर महानगरपालिका, सांगली, मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका

Post Views: 215
Previous Post

मेंढपाळाची लेक हाँगकाँगमध्ये करणार भारताचं नेतृत्व, बारामतीच्या तरुणीचा थक्क करणारा प्रवास….

Next Post

मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षं पूर्ण…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षं पूर्ण…

मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षं पूर्ण...

ताज्या बातम्या

कौतुकाची थाप प्रगतीसाठी प्रेरणादायी : काळे

February 23, 2026

राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धेसाठी तेजश्री राजगिरे हिची निवड

February 23, 2026

सेंट्रल बँके तर्फे कृषी कर्ज जनजागृती शिबीर संपन्न

February 23, 2026

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन

February 23, 2026

शिवजयंती निमित्त थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील मंडळाकडून सरबत वाटप

February 23, 2026

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

February 23, 2026

महापालिकेची पहिली सभा : चूक कोणाची ? तहकूब योग्य की अयोग्य?

February 23, 2026

“स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियानातून कंबर तलाव परिसरात कचऱ्याची सफाई

February 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0697318

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697