Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेची पहिली सभा : चूक कोणाची ? तहकूब योग्य की अयोग्य?

तरुण भारतbyतरुण भारत
February 23, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याआधीच सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळाचे सावट पसरले. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या घोषणेदरम्यान झालेल्या विसंगतीने सत्ताधारी आणि प्रशासन दोघांनाही अस्वस्थ केले. नऊ जागांपैकी आठच नावे जाहीर होणे आणि त्यानंतर वेगळी संख्या वाचली जाणे या प्रकारामुळे सभागृहात संभ्रम निर्माण झाला.तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर विरोधकांनी घातलेला गोंधळ समर्थनीय नव्हता.

विषयांतर होत राहिले.सभाच भरकटली आणि अखेर सभा तहकूब करण्याची वेळ आली. पहिल्याच दिवशी महापालिकेत तणावाचा स्फोट झाला. नियम, जबाबदारी आणि राजकीय परिपक्वतेची  कसोटी लागली. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. बहुमत असताना सभागृह ठप्प, प्रक्रियेतील चुका की राजकीय अस्वस्थता? तहकूब निर्णयावर चर्चा रंगली आहे. 

            सोलापूर महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सोलापूर महापालिकाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे शहराच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वीकृत सदस्यांच्या घोषणेदरम्यान झालेल्या प्रक्रियात्मक विसंगतीमुळे सभागृहात तणाव निर्माण झाला आणि अखेर सभा तहकूब करण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकी चूक कोणाची? दोष कोणाचा? आणि तहकूब करण्याचा निर्णय योग्य होता का? स्वीकृत सदस्यांच्या घोषणेत गोंधळ झाला. महापालिका कायदा आणि ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार स्वीकृत सदस्यांची नावे स्पष्ट, पूर्ण आणि नोंदवहीत अचूकपणे जाहीर होणे आवश्यक असते. मात्र नऊ जागांपैकी आठच नावे जाहीर झाली आणि त्यानंतर नगरसचिवांकडून वेगळी संख्या वाचली गेल्याने संभ्रम वाढला. ही केवळ तांत्रिक चूक नव्हती, तर प्रशासनिक आणि राजकीय समन्वयातील त्रुटी मानली जात आहे.

           सत्ताधारी 88 आणि विरोधक 14 असे बलाबल आहे. बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून अधिक शिस्तबद्ध तयारी अपेक्षित असते. त्यामुळे प्राथमिक जबाबदारी सत्ताधारी पक्षाच्या नियोजनातील कमतरतेवर येते. तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर विरोधकांनी घातलेला गोंधळ  समर्थनीय नव्हता. वास्तविक पाहता उर्वरित एक सदस्याची घोषणा पुढील सभेत करण्याचे निश्चित झाले होते. अर्थातच तो अधिकार सभागृहाचा आहे. तरीही या विषयावर अधिक भर देऊन गोंधळ झाला. परिणामी इतर विषय बाजूला सारले गेले किंबहुना विकासाच्या मुद्द्यांना दुय्यम स्थान मिळाले आणि सभाच भरकटली. विरोधकांनी विकासात्मक प्रस्ताव आणि विषयांना अधिक प्राधान्य दिल्यास निश्चितच सभेचा उद्देश सफल होईल अन्यथा सभा तहकुबीचा सिलसिला असाच कायम राहील.

             नगरसचिव यांनी स्पष्ट व एकसंध माहिती देणे अपेक्षित होते. वेगवेगळे आकडे जाहीर झाल्याने गोंधळ अधिकच वाढला. प्रशासन तटस्थ आणि अचूक राहणे ही लोकशाही प्रक्रियेची मूलभूत गरज आहे. येथे संवादातील विसंगतीमुळे परिस्थिती चिघळल्याचे दिसून आले. सभागृहात नगरसेविका श्रद्धा पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न प्रक्रियात्मक स्पष्टतेशी संबंधित असल्याने तो वैधानिक चौकटीत बसणारा होता. मात्र त्या प्रश्नानंतर निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका व्यक्तीच्या मुद्द्यापेक्षा सत्ताधारी-प्रशासनातील समन्वयाच्या कमतरतेचे प्रतीक ठरला. त्यामुळे प्रश्नापेक्षा त्यावर दिलेले अपुरे व विसंगत उत्तरच परिस्थिती चिघळण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले. एकूण चित्र पाहता, प्रक्रियात्मक चूक सत्ताधाऱ्यांकडून झाल्याचे स्पष्ट होते. विरोधकांचा मुद्दा नियमाधारित असला तरी त्यांची शैली आक्रमक ठरली आणि तहकूब हा निर्णय नियमसंगत असला तरी व्यवस्थापनातील आणि समन्वयातील कमकुवतपणाचे द्योतक ठरला आहे. 

       बहुमताचा दावा होता पण पहिल्याच सभेत प्रक्रियेची शिस्त कोलमडली. प्रश्न यादीचा नव्हता, तर नेतृत्व आणि समन्वयाच्या तयारीचा होता. सभा तहकूबने गोंधळ थांबला पण राजकीय परिपक्वतेवरचे प्रश्न अधिकच गडद झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विरोधकांची आक्रमक भूमिका : नियमभंग की हक्क?

सभागृहात मुद्दा उपस्थित करणे, हरकती नोंदवणे आणि यादी पुन्हा वाचण्याची मागणी करणे हे विरोधकांचे वैधानिक अधिकार आहेत. त्या दृष्टीने त्यांची मागणी नियमाधारित होती. मात्र डायससमोर घोषणाबाजी करणे आणि कामकाज ठप्प करणे ही कृती सभागृहाच्या शिस्तनियमांच्या चौकटीत बसत नाही. डायसवर जाऊन धिक्कार करणे लोकशाहीच्या मर्यादेत बसत नाही

यामुळे विरोधकांचा मुद्दा योग्य असला तरी त्यांची पद्धत आक्रमक आणि नियमबाह्य ठरते. लोकशाही व्यवस्थेत आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो, परंतु तो संस्थात्मक शिस्तीच्या चौकटीतच वापरणे अपेक्षित आहे, असा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे.

सभा तहकुब : वैधानिक अधिकार की राजकीय बचाव ?

सभागृहात गोंधळ वाढल्यास अध्यक्षांना सभा तहकूब करण्याचा अधिकार असतो. नियमांनुसार शिस्त राखणे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास कामकाज स्थगित करणे ही अध्यक्षांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने पाहता, तात्कालिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तहकूब करण्याचा निर्णय वैधानिक होता. मात्र पहिल्याच सभेत, सत्ताधाऱ्यांकडे स्पष्ट बहुमत असताना, स्वतःच्या प्रक्रियात्मक गोंधळामुळे सभा तहकूब करावी लागणे हा राजकीयदृष्ट्या बचावात्मक निर्णय ठरला. नेतृत्वाची तयारी आणि समन्वय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

सत्ताधारी पक्षाची जबाबदारी काय ?

स्वीकृत सदस्यांच्या घोषणेत स्पष्टतेचा अभाव दिसून आला.

कामकाजाच्या पूर्वतयारीत कमतरता स्पष्ट दिसून आली. 

सभेपूर्वी अंतर्गत समन्वयात त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे  सभेवेळी 88 सदस्यांचे महाबहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाने सभा शास्त्र, आवश्यक रणनीती, पूर्वतयारी, संभाव्य अडचणी, पक्षांतर्गत समन्वय, जबाबदारी वाटप, तातडीचे निर्णय या संदर्भात परफेक्ट नियोजन करणे आवश्यक आहे. ते दिसून आले नाही. सत्ताधारी काही नगरसेवक विरोधकांना मदत होईल अशी कार्यपद्धती करत नाहीत ना ? पहिल्याच सभेत काही जणांकडून विषयांतर का करण्यात आले ? उत्तराला प्रश्न का असे पडले ? त्या दृष्टीने वेळीच हस्तक्षेप महत्त्वाचा ठरतो. पार्टी मीटिंगमध्ये आवश्यक ते धडे देण्याची गरज होती. लोकशाही व्यवस्थेत बहुमत म्हणजे केवळ संख्या नव्हे; तर शिस्त, तयारी आणि प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारीही तितकीच मोठी असते. हे महत्वाचे आहे. 

Post Views: 82
Previous Post

“स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियानातून कंबर तलाव परिसरात कचऱ्याची सफाई

Next Post

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

ताज्या बातम्या

वांगचुकने केले वंदे भारतचे तोंड भरून कौतुक

July 31, 2026

महाराष्ट्र कर्नाटकाचा संपर्क तुटला

July 31, 2026

एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 10 जखमी

July 31, 2026

अजिंक्य राहणे यांची निवृत्ततिची घोषणा ,करताना झाले भावनिक….

July 31, 2026

तुंगारेश्वर धबधब्यातून मानवी साखळी करून बाहेर पडले पर्यटक

July 31, 2026

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहोळ तालुक्यातील बनावट देशी दारू कारखान्यावर केली धडक कारवाई……

July 31, 2026

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015407

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!