शहरातील औंढा रोडवरील एमआयडीसी परिसरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा हायवाट्रक पोलीसांनी पकडला यात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली आहे
याबाबत पोलिसांकडून मिळाळलेली अधिक माहिती अशी की पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके हे रात्रीच्या गस्तीवर असताना आडगाव फाटा कडून जिंतूरकडे चोरटी वाहतूक करणारा हायवाट्रक येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती म्हणुन शहरातील जिंतूर औंढा रोडवरील एमआयडीसी परिसरा असलेल्या हॉटेल समोर तपासणी दरम्यान हायवाट्रक मध्ये अवैद्य वाळू साठा आढळून आला होता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर राठोड व पांडुरंग घुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी चवरे हे करत आहेत