मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2. राज्य निधी,जिल्हा वार्षिक योजना, नाबार्ड अर्थसहाय्य (RIDF) आणि आशियाई विकास बँक (ADB) मार्फत जिंतूर आणि सेलू तालुक्यातील तब्बल 32 कोटी रुपयांची कामे मंजूर… महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टी आणि कल्पक नेतृत्वा मुळे राज्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्राधान्यांनी सुचविलेल्या जिंतूर मतदार संघातील विविध विकासकामांना आणि रस्त्यांना तब्बल 32 कोटी रुपये कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये जिंतूर आणि सेलू तालुक्यातील खालील दर्शविलेली विविध विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत यात प्रामुख्याने.
1) प्ररामा 2 ते पाचेगाव रस्ता.रक्कम 3 कोटी 63 लाख.
2) प्रजिमा 2 ते मोहाडी रस्ता.रक्कम 1 कोटी 96 लक्ष.
3) रीडज ते सांगळेवाडी रस्ता.रक्कम 1कोटी 25 लक्ष.
4) इजीमा 37 ते जांब रस्ता. रक्कम 68 लक्ष.
5) प्ररामा 2 ते जोगवाडा सोस ब्राह्मणगाव ते कवडा रस्ता. रक्कम 6 कोटी 14 लक्ष.
6) प्रजिमा 33 ते करवली रस्ता. रक्कम 3 कोटी 85 लक्ष.
7) इजिमा 37 ते सायखेडा रस्ता. रक्कम 2 कोटी 65 लक्ष.
8) प्रजिमा 33 ते राजुरा मापा रस्ता. 7 कोटी 57 लक्ष.
9) प्रजिमा 28 ते गोहेगाव रस्ता. रक्कम 2 कोटी 90 लक्ष.
10) रामा 253 ते सोन्ना रस्ता.रक्कम 1 कोटी 27 लक्ष.
असे एकूण 32 कोटी रुपयांची कामे मंजूर.