खडकवासला धरण साखळीत रात्री दहा वाजेपर्यंत पानशेत येथे तीन, वरसगाव येथे सात, खडकवासला येथे २ तर टेमघरला ४५ मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार ही धरणात मिळून २७.७४ टीएमसी म्हणजे ९५.१६ टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला धरणात १.४४ टीएमसी म्हणजे ७२.८३ टक्के पाणीसाठा आहे. टेमघरमध्ये २.८३ टीएमसी म्हणजे ७६.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, पवना, भामा- आसखेड धरण १०० टक्के भरले आहे. शहरात शनिवारी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे व सिंहगड रस्ता भागात मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धा फुटापेक्षा जास्त पाणी साठले होते.