लातूर, दि.1 फेब्रुवारी- कारखान्याच्या वतीने संपूर्ण ऊस गाळपाची हमी फेब्रुवारी महिन्यातील ऊसाला प्रतिटन 100 रुपये अधिकचा दर प्रतिहेक्टरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना मार्गदर्शन करणार उशिरा पडलेला पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकुल हवामानामुळे यावर्षी एकरी ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे झालेले नुकसान आगामी वर्षात भरुन काढण्यासाठी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन ट्वेन्टीवन शुगर्स लि., च्या वतीने कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात प्रोत्साहनपर ऊस लागवड योजना जाहिर केली आहे. या महिन्यात लागण झालेल्या ऊसाच्या गाळपाच्या हमी बरोबरच प्रतिटन 100 रुपये जास्तीचा दर देण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे. मागच्या वर्षात सर्वत्र अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली असताना ट्वेन्टीवन शुगर्सने शेतकर्यांशी असलेल्या बांधीलकीची जाणीव ठेवून कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी जूनपर्यंत कारखाने चालवले. या वर्षी मात्र पाऊस उशिरा सुरु झाला, पाऊस सुरु झाल्यानंतर तो बराच काळ रिमझिम पडत राहिला. त्यामुळे ऊसाचया वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे ऊसाची वाढ व्यवस्थीत झाली नाही परिणामी ऊसाचे एकरी उत्पादन घटले आहे. या परिस्थीतीत ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा निर्णय ट्वेन्टीवन शुगर्स लि., ने घेतला आहे. या शेतकरी वर्गाला उशिराने ऊस लागवड करता यावी म्हणून विशेष योजना जाहिर केली आहे. 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान लागवड झालेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करुन या ऊसाला प्रतिटन 100 रुपये अधिकचा दर देण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे. ट्वेन्टीवन शुगर्सच्या या ऊस लागवड योजनेत सभासद आणि बिगर सभासद शेतकर्यांना सहभाग घेता येणार आहे. या लागवडीसाठी ऊस रोपे किंवा ऊस बेणे उपलब्ध करुन देण्यासाठी कारखाना सहकार्य करेल. ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याच्या वतीने मेळावे घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. ऊस उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणारे वसंत ऊर्जा हे औषध व्ही.एस.आय. च्या दरात कारखाना स्थळावर उपलब्ध करुन दिले जाईल. या योजनेसाठी ट्वेन्टीवन शुगर्स च्या 1,2,3 या तिन्ही युनीटसाठी प्रत्येकी 5000 हजार हेक्टरची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी तातडीने ऊस लागवडीची तयार करुन कारखान्याशी संपर्क करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...