काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना तापाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळून आली. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या (I.N.D.I.A) बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.