साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शिखरावर सुर्य दर्शन अगोदर गुलाबी रंगाची गुढी उभारली गेली. महंत वाकोजी बाबा, महंत तुकोजी बाबा, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या हस्ते गुढी उभारली गेली. पहाटे चरणतिर्थ संपल्यानंतर देवी आरती होते, विधी होतात. देवीला हार घातला जातो. नंतर देवीच्या कळसाच्या शिखरावर गुढी उभारली जाते. मंदिरात गुढी उभारल्यानंतर तुळजापूर शहरातील नागरिक गुढी उभारतात. आजच्या दिवशी तुळजापूर शहरात भाविकांची गर्दी असते. तुळजा भवानीच्या दर्शनसाठी राज्यातील तसंच परराज्यातील भाविक दाखल होत असतात.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...