सोलापूर शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून दागिने तसेच रोकड पळविणारा चोरटा गजाआड करण्यात आला. तीन गुन्हे उघडकीस आले असून शहर गुन्हे शाखेने २ लाख ६४ हजारांचा ऐवज हस्तगत केला.गोरखनाथ चंद्रकांत जाधव (वय ३६, रा. अबुहमी मस्जीद शेजारी, विजापूर रोड) असे गजाआड करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणांहून दागिने तसेच रोकड पळविल्याच्या घटना घडल्याची नोंद केली. पोलिसात झाल्या. अशा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी शहर गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना, . वांगी रस्त्यावरून कापडी पिशवी घेऊन जात होता. संशयितास पथकातील कर्मचाऱ्याने हटकले. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडील पिशवीत आढळून आलेले दागिने तसेच रोख रक्कमेबाबत चौकशी केली. परंतु गोरखनाथने दिलेली उत्तरे उडवाउडवीची असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्याच्याकडे पुन्हा त्या दागिन्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर मात्र गोरखनाथ याने ते चोरीचे असल्याची माहिती पथकाला दिली. शिवाय फौजदार चावडी व सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यानंतर गुन्ह्यातील ८२.५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि ३२ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पाटील, फौजदार अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, अंकुश भोसले, राहुल तोगे, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अजिंक्य माने आदींनी केली.