चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर नेहमी एकसारखे नसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो. यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. शनिवारी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. असा योग हजारो वर्षानं जुळून आला आहे. 21 जानेवारी रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते. पण अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही.
चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ
आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. तसेच चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. चंद्र लंब वर्तुळाकार आकारात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि एक वेळ अशी येतो जेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूर असतो. 2023 या वर्षी तब्बल 993 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला. पण शनिवारी अमावस्या असल्यामुळे हे सुंदर दृष्यं आपल्याला पाहता आलं नाही.
993 वर्षांनी दुर्मिळ योग
चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ होता, पण अमावास्या असल्यामुळे उत्तम योग जुळूनही आपल्याला हा अद्भूत नजारा पाहता आला नाही. 21 जानेवारी 2023 रोजी 933 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. याआधी ही खगोलीय घटना 1030 साली घडली होती. आता हा दुर्मिळ योग 345 वर्षांनी दिसणार आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. शनिवारी हा दुर्मिळ योग होता, पण अमावस्येमुळे आपण ही सुंदर खगोलीय घटना पाहण्यापासून मुकलो आहे.
आता 345 वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार चंद्र
993 वर्षांनंतर अशी भौगोलिक घटना घडली आहे, जी आपल्याला पाहता आली नाही. 993 वर्षांनंतर शनिवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. तर रविवारी म्हणजे, आज शुक्र आणि शनि चंद्राच्या अगदी जवळ असतील आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतील.