देवणी ठाणेची अवैध धंद्यावर कारवाई देशी/ विदेशी दारू सह 1लाख 66 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणीचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने देवणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हे पथक पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 27 जानेवारी रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, बोळेगाव ते आळवाई जाणारे रोडवर एक ओमनी कंपनीच्या गाडी मधून देशी/ विदेशी दारूची अवैद्य वाहतूक होणार आहे. त्यावरून पथकाने बोळेगाव येथे सापळा लावला असता थोड्याच वेळात बातमीप्रमाणे एक ओमनी कार क्रमांक एम.एच. 01 एन.ए.4661 अशी येताना दिसली. त्यावर पथकाने सदरची गाडी थांबून पाहणी केली असता त्यामध्ये बॉक्समध्ये वेगवेगळ्या लेबलची देशी/ विदेशी दारू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर बेकायदेशीररित्या विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दारूची चोरटी वाहतूक करणारा इसम नामे राजू विश्वास पारशेट्टी, राहणार बोळेगाव, तालुका देवनी जिल्हा लातूर.
त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे वाहनासह 1 लाख 66 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस ठाणे देवणी चे सहायक फौजदार कोडामंगले हे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणीचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस अमलदार सहाय्यक फौजदार कोंडामंगले, बनाळे , डोईजड यांनी केली आहे.
Post Views: 92