इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
याबाबत सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख लोकांना आयकराची नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्या लोकांनी रिटर्न्समध्ये गडबड केली आहे त्यांच्यावर आयकर विभागाने दंडुका उभारला गेला आहे. आगामी मार्च 2024 पर्यंत या सर्व प्रकरणांचे निराकरण केले जाईल. अर्थमंत्र्यांच्या मते आयकर विभागाने या नोटीशीचे काम जलद केले आहे. आगामी काळात त्यात तेजी दिसेल.कर विभागाकडून पाठवण्यात येणाऱ्या नोटीशी प्रकरणी पारदर्शी आणि जबाबदारीने व्यवहार केला जाईल. तांत्रिक अडचणी दूर करुन सर्वसामान्यांचे काम मिनिटात करण्यासाठी आयकर विभागाने अपडेट केले आहे.
गेल्या वर्षी आयकर रिटर्न प्रोसेसिंगसाठी 26 दिवस लागणारा अवधी आता केवळ 16 दिवसांवर आला आहे. आयकर विभागाने करदात्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. किंबहुना ही किचकट प्रक्रिया सोप्पी झाल्याने रिटर्न्स फाईल करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आतापर्यंत 4 कोटींहून अधिक आयकर रिटर्न्स दाखल करण्यात आले आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे. इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत 80 लाख रिफंड जारी केले आहेत.