गेल्या तीन वर्षांपासून महिला हॉस्पिटल अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका येथे रस्त्याची दुरावस्था झाल्याने तसेच २ ते ३ वर्षांपासून आमदार सुभाष देशमुख महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्याकडे सतीश सुरवसे हे प्रयत्न करीत होते. सदर रस्त्यासाठी आयुक्त शितल तेली-उगले यांनी प्रयत्न करून राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत १.५० कोटी रुपये मंजूर केले. त्याकरीता या परिसरातील समस्त रहिवाशांकडून आ.सुभाष देशमुख आयुक्त शितल तेली-उगले यांचे आभार , रस्ते सुरुवात करताना सिटी इंजिनिअर लक्ष्मण चलवादी सतीश सुरवसे आणि झेडो डोंगरे , इंजिनिअर अंत्रोळीकर अशा आशयाचे फलक लावले मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
दोनच दिवसापूर्वी केलेल्या रस्त्यांची अक्षरशः धूळधाण उडाली आहे. सदरचा डांबरी रस्ता सोमवारी अर्धा तासाच आलेल्या पावसाने उखडून गेलेला दिसत आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम याठीकानी झाल्याने काही काळासाठी आलेल्या पावसामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. सदरच्या डांबरी रस्त्यामध्ये निकृष्ट साहित्य वापरल्याने याचीही अवस्था बनली असून लावली जाव टिमकी बजाव आशा भूमिकेत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ठेकेदार आपल्या कर्तव्याला तिलांजली देत आहेत. वास्तविक पाहता कुमठा नाका ते महिला हॉस्पिटलकडे जाणारा प्रमुख रोड बनला असून या रस्त्याची अशी दुर्दशा बनल्यामुळे अपघाताचा धोका आहे.
महापालिकेमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे यामुळे अशा घटना घडत असून याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. यावेळी सामजिक कार्यकर्ते नागनाथ शिवसिंगवाले यांनी सदरचा रस्त्यावरून हात फिरवला असता अक्षरशः हातामध्ये खडी आल्याचे चित्र दिसून आले. अशा या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे कामकाज कसे झाले आहे असे सांगताना महापालिका तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर टीका केली आहे. एकंदरीत महापालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात फोटोसेशन करत या रस्त्याचे उद्घाटन केले मात्र या रस्त्याची काय अवस्था झाली आहे हे त्यांनी स्वतः येऊन पहावे तसेच महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी देखील याची गांभीर्याने दखल घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात येत आहे.