दोन डॉक्टरांनी गंमत म्हणून कारची शर्यत लावली. दोन्ही गाड्या अतिवेगात असतानाच अपघात घडला. मात्र दोघांचेही दैव बदलवत्तर म्हणून ते सुखरूप बचावले आहेत. शर्यतीदरम्यान अतिवेगात असलेल्या दोन कार एकमेकांना घासून पलटी झाल्या. शर्यतीचा हा थरार नागपूरातील आहे.
दोन्ही कार उलटल्यानंतर यात दोन्ही डॉक्टरांना किरकोळ इजा झाली. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्री प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील पडोळे चौकात घडली. याप्रकरणाची नोंद घेत प्रतापनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वरूण व अभिनव अशी डॉक्टरांची नावे आहेत. दोघेही हिंगण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून तेथेच सेवा देतात. रविवारी रात्री दोघेही वेगवेगळ्या कारने मित्रांसह जेवायला हॉटेलमध्ये गेले. जेवणकरून ते कारने परत येते होते. प्रतापनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येताच दोघांनी शर्यत लावली. दोघांनाही कारच वेग वाढविला. काही अंतर जात नाही तोच एका डॉक्टरचे कारवरील नियंत्रण सुटले. कार एकमेकांना घासली.
दोन्ही डॉक्टरचे कारवरील नियंत्रण सुटल्योन कार उलटल्या व दोन्ही कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने दोघांना गंभीर इजा झाली नाही. कारमध्ये असलेले त्यांचे मित्र कारमधून उतरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. क्रेनच्या मदतीने पोलिसांनी कार बाजूला केल्या.