माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये ईडीने गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली मलिक यांना अटक केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून मलिक न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. तब्बल दीड वर्षे ते तुरुंगात होते. मात्र वैद्यकीय उपचारासाठी त्यांना ११ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला होता. या जामीनाला आता न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.
मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, त्यांची किडनी अजून योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आम्ही ताजे रिपोर्ट सादर करत आहोत, वैद्यकिय कारण लक्षात घेता त्यांना जामीन द्यावा, असा दावा वकिलांनी केला. यावर न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.