शहरात बॅनर लावण्याची जणू स्पर्धा लागली असून या बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच या बॅनरमूळे अपघाताच्या घटना देखील घडत असून अशीच घटना आज सोमवारी शिवाजी नगर मार्गावर घडली.
आज सोमवारी एक जोडपे दुचाकीवरून जात असताना शिवाजी नगर येथील कुसुमताई चौकातून जात असताना या ठिकाणी फुटपाथच्यावर लावलेल्या बॅनरला दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिला धडकली.
दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला बॅनरच्या उंचीचा अंदाज न आल्याने ही महिला बॅनरला धडकून दुचाकीवरून खाली पडली. यात महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. अपघाताची ही घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे