शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन मुलींचे आमिष दाखवून अज्ञात इसमाने अपहरण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अपहरणाचा पहिला प्रकार पेठ रोड येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी पेठ रोड येथील शनी मंदिराजवळ असताना अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी बिटको कॉलेजमागील चव्हाण मळा येथील घरी होती. त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. उशिरापर्यंत ही मुलगी घरी परतली नाही, म्हणून तिच्या पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची फिर्याद नोंदविली आहे.