या उंटांची सुश्रुषा, खाणे पिणे हे सगळे तिथे होईल.हे उंट कत्तली साठी नेले जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप करून त्यांचा ताबा घेण्यात आला. या धांदलीत एक उंट गेला. पांजरपोळच्या जमिनीवर डोळा असणाऱ्यांनी अशी सामाजिक जबाबदारी घेण्याची सोय देखील विकसित होऊ पाहणाऱ्या शहरामध्ये असायला पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. दिसेल त्या जागेवर निव्वळ उद्योग सुरु करणे, कारखाने थाटणे अशा हव्यासाने शहराचे मातेरे होईल हे समजायला फार मोठी वैचारिक कुवत असण्याची गरज नाही.
बिल्डर्स बरोबर व्यवहार केले होते किंवा पांजरपोळच्या चुंचाळ्याची जागा संबंधित ट्रस्टची नाहीच अशा कंड्या पिकवून नाशिक करांना भ्रमित करण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. नाशिकच्या भल्यासाठी, नाशिकच्या भविष्यासाठी नाशिककरांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये अशी विंनती. ज्या कुणाला तरीही त्यांच्या शंकेच्या शेळ्या हाकायच्या आहेत त्यांनी पंजरपोळ्यात येऊन एकदा उंटावर येऊन बसावे. जिल्ह्यातल्या अनेक पडीक जमिनी सोडून केवळ चुंचाळ्याच्या निसर्ग संपदेची कत्तल करण्याचा घाट घातला जातो आहे हे चमत्कारिक आणि संशयास्पद आहे. नाशिककरांनी एकदिलाने एकत्र येऊन असे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. कारखाने उभे करण्यासाठी निसर्गाची नासाडी महागात पडेल.
Post Views: 90