Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

घरकुल बांधणीसाठी आत्तापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना १८०० ब्रास वाळूचे मोफत वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधणीस गती देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना तब्बल १८०० ब्रास वाळूचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

   दरम्यान, या योजनेमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांना स्वतःचे घर उभारण्यासाठी शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मोफत वाळू वितरणाच्या या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला वेग आला असून, ‘घरकुलाचे स्वप्न’ साकार होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. घरकुल बांधणी करताना वाळूचा खर्च हा ग्रामीण कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरतो. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मोफत वाळू वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होत आहे.

   एकीकडे प्रधानमंत्री आवास योजना सुरळीत असताना दुसरीकडे रमाई आवास योजना तसेच जल जीवन मिशन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, या संदर्भात देखील शासन स्तरावर कामकाज सुरू आहे. लवकरच योजना कार्यान्वित केल्या जातील असेही जंगम यांनी सांगितले.

चौकट 

ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी

जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. घरकुलाचे काम प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री करूनच वाळूचे वाटप करण्यात येते. यामुळे अपात्र लाभार्थ्यांकडे वाळू वळवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

तपासणीदरम्यान बांधकामाची प्रगती, आवश्यक साहित्य, लाभार्थ्यांची स्थिती आदी बाबींचा टप्प्याटप्प्याने सविस्तर आढावा घेतला जातो. प्रशासनाचा हा काटेकोर दृष्टिकोन 

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस हातभार लावत आहे.

चौकट 

मोफत वाळू वितरणासाठी आठवड्यातून दोन दिवस नियोजन

मोफत वाळू वितरणासाठी आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्या दिवशी संबंधित लाभार्थ्यांना नियोजनपूर्वक वाळू पुरवठा केला जातो. वितरण प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधला जात आहे. ज्या लाभार्थ्यांना वाळू वितरण करावयाची आहे त्यांना यापूर्वीच वाळू देण्यासंबंधीचे सूचना दिल्या जातात. त्यानुसार त्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी तपासणी झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या नावाने पाच ब्रास पैकी दोन ब्रास व त्यानंतर तीन ब्रास अशाटप्प्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे मोफत वितरण केले जात आहे. वाळू वितरण तसेच वाळूचा गैर प्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने या प्रकारे वाळू वितरण व्यवस्था सुरू ठेवली असून त्यानुसार आत्तापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना १८०० ब्रास वाळू वितरण झाले असून, त्या पद्धतीने घरकुलाचे कामकाज सुरू असल्याचेही जंगम यांनी सांगितले.

कोट

घरकुल योजनांना चालना

प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरे बांधली जात आहेत. मात्र बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोफत वाळू वितरणामुळे या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. घरकुलाचे काम रखडू नये, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. पुढील काळातही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.

Post Views: 73
Previous Post

साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Next Post

भेंड गावाच्या विकासाला मिळणार गती; प्रशासनाकडून सेंद्रिय शेती व शाश्वत विकासाचा मंत्र

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भेंड गावाच्या विकासाला मिळणार गती; प्रशासनाकडून सेंद्रिय शेती व शाश्वत विकासाचा मंत्र

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1235920

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!