Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतले आशीर्वाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 30, 2023
in maharashtra
0
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतले आशीर्वाद…
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात चालू असलेल्या महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.

     सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते.

     सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की ज्याप्रमाणे एक थेंब जेव्हा सागराला मिळतो तेव्हा त्याला सागराची उपमा मिळते. तद्वत मनुष्य जेव्हा भ्रामक ‘मी’चे अस्तित्व सोडून देतो आणि ईश्वररूपी शाश्वत ‘तू’च्या प्रति समर्पित होतो तेव्हा त्याला ईश्वरस्वरूप झाल्याचा श्रेष्ठ दर्जा आपसूकच प्राप्त होतो.

     शेवटी, सद्गुरु माताजींनी समजावले, की ज्याप्रमाणे साबण आणि पाणी यांची सोबत केल्याने मळलेले कपडे स्वच्छ होतात तद्वत परम पावन परमात्म्याशी नाते जोडून त्याच्याशी अभिन्नता प्राप्त केल्याने आपण अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातो, ज्यायोगे आपल्या जीवनात सहजपणे आत्मिकता आणि मानवता यांचा संगम होतो.

मा.मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट:

     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे.  आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत औरंगाबादचे पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे आणि मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 111
Previous Post

वधू-वर परिचय मेळाव्यात वधूच दाखवली नाही; शेकडो लग्नाळू तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक !

Next Post

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात डॉ. सुधांशू त्रिवेदी यांची पत्रकार परिषद….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात डॉ. सुधांशू त्रिवेदी यांची पत्रकार परिषद….

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात डॉ. सुधांशू त्रिवेदी यांची पत्रकार परिषद....

ताज्या बातम्या

निरोगी शरीर हे सर्व साधनांचे माध्यम – डाँ.एम.के.इनामदार

February 23, 2026

सुशीला नांगरे पाटील यांच्या सत्त्व संचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन

February 23, 2026

अंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत आयजीकेएफ टीमचे यश

February 23, 2026

तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरणात आनंदाची चैतन्यपूर्ण घंटा

February 23, 2026

उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यास प्राप्त

February 23, 2026

प्रभाग १७ मध्ये विकास कामांचा धडाका; भुयारी गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन 

February 23, 2026

मोहोळ शहरांमध्ये अचानक पोलीस बंदोबस्त वाढविला

February 23, 2026

भोकरदन मध्ये स्वच्छता अभियान #public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0696853

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697