स्टेबल मनी, हा भारतातील पहिला फिक्स्ड रिटर्न इनव्हेस्टमेंट (प्लॅटफॉर्म आता अधिकृतपणे डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा कंपनीने केली आहे. स्टेबल मनी मार्केटप्लेस वैयक्तिक पातळीवर विश्वासार्ह आणि निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. या प्लॅटफॉर्मद्वारे निश्चित ठेवी (एफडी), डेट म्युच्युअल फंड्स, बाँड्स आणि इतर कमी जोखमीचे असेट क्लास उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे या प्लॅटफॉर्मवर सुमारे २०० बँकांच्या निश्चित ठेवींच्या व्याजदरात तुलना करून ग्राहकांना डिजिटल साधनांच्या मदतीने आपल्या निश्चित ठेवी हाताळण्यासाठी मदत केली जाते. प्लॅटफॉर्मने नुकतेच मॅट्रिक्स आणि लाइटस्पीड यांच्याकडून निधी मिळवला असून आणखी काही भागीदार बँकांचा समावेश केला आहे.
स्टेबल मनी प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या नव्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या निश्चित परतावे देणाऱ्या गुंतवणुकीला नवा आकार देत आहेत. या सुविधांमध्ये ब्रेक एफडी या सुविधेचा समावेश आहे, ज्यामुळे ठेवीचा कालावधी संपण्यापूर्वी आणि परताव्यांचे नुकसान न करता पैस्या मिळवता येऊ शकतात. एफडी लॅडरिंग या सुविधेअंतर्गत गुंतवणुकदारांना लिक्विडीटी आणि परतावे अशा दोन्हींचा विचार करून समतोल पोर्टफोलिओ राखता येतो, तर स्विच एफडी सुविधेमुळे गुंतवणुकदारांना बाजारपेठेतील बदलांप्रमाणे सहजपणे बदल करता येतात.
लाँचप्रसंगी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांबरोबर विविध भागीदार बँकांनी चर्चासत्रात भाग घेतला ‘वाढती महागाई आणि त्याचे निश्चित उत्पन्नावर होणारे परिणाम’ आणि ‘आर्थिक नियोजन : शिस्त आणि मालमत्ता विभागणीचे महत्त्व’ अशा विषयांवर त्यात चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या नामवंतांमध्ये श्री. कल्पेन पारेख – एमडी आणि सीईओ- डीएसपी म्युच्युअल फंड, संजय शारदा – प्रमुख – कन्झ्युमर बँकिंग उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, केशव मिश्रा – कार्यकारी उपाध्यक्ष, प्रमुख डिजिटल बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, वेदांश चांडक – अध्यक्ष, कॉर्पोरेट फायनान्स आणि ट्रेझरी, श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि श्री. कीर्तन शहा – सह- संस्थापक आणि सीईओ, फायनान्शियल प्लॅनिंग अकॅडमी यांचा समावेश होता.
स्टेबल मनीचे संस्थापक सौरभ जैन आणि हरीश रेड्डी आपला आनंद व्यक्त करत म्हणाले, ‘स्टेबल मनीसह आम्ही आखलेले उद्दिष्ट स्पष्ट आहे – ते म्हणजे निश्चित परतावा असलेले गुंतवणुकीचे प्रकार सर्वांसाठी उपलब्ध करणे आणि लाखो भारतीयांना गुंतवणुकीचे पारदर्शक व युजर फ्रेंडली पर्याय मिळवून देणे. आज त्याची सुरुवात झाली आहे, मात्र आमचे उद्दिष्ट त्याही पलीकडे जाणारे आहे. आम्ही शाश्वतता आणि लवचिकता यांसह आर्थिक सुरक्षा मिळवून देण्याचे, विशेषतः अनिश्चित काळात ही सुरक्षा पुरवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.’
लाँच कार्यक्रमात स्टेबल मनीच्या प्रतिष्ठित भागीदार बँका आणि प्रभावशाली एंजल गुंतवणूकदार उपस्थित होते. सॉफ्ट लाँच आणि त्यानंतरच्या बीटा टेस्टिंगपासून स्टेबल मनीला प्लॅटफॉर्मवर ५०,००० युजर्सनी नोंदणी केली आहे. ही चांगली सुरुवात आर्थिक यंत्रणेमध्ये या प्लॅटफॉर्मची क्षमता दाखवण्यासाठी पुरेशी आहे.
स्टेबल मनी लवकरच भारताच्या प्रवासाची सुरुवात करणार असून १५ पेक्षा जास्त शहरांत कार्यशाळा व परिषदांच्या निमित्ताने निश्चित- उत्पन्न साधनांचे फायदे यांविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. आर्थिक सक्षमता पसरवण्यासाठी बांधील असलेल्या स्टेबल मनीने गुंतवणुकदारांना आधुनिक सुविधा व ज्ञान देत जास्त चांगले व आश्वासक आर्थिक भविष्य मिळवून देण्याचे ठरवले आहे.