महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली असून किरकोळ देवाणघेवाणीच्या व्यवहारावरून पंढरपूर तालुक्यातील अनवली इथे वडापाव विकणाऱ्या व्यक्तीने सावकाराचा काटा काढलेला आहे. अवघ्या बारा तासांच्या कालावधी पोलिसांनी अखेर आरोपीला गजाआड केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नितीन माळी नावाचा एक वडापाव विक्रेता अनवली गावात राहत असून वडापाव विकून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो . त्याच गावातील 55 वर्षीय सावकार असलेला अभिमान मारुती मेटकरी याने त्याला नितीन यास काही रक्कम व्याजावर दिलेली होती. नितीन यास रकमेची परतफेड करण्यास अपयश येत असल्याने धष्टपुष्ट असलेल्या सावकाराने नितीन यांच्या आणि कुटुंबीयांबद्दल अर्वाच्च शब्द काढलेले होते म्हणून नितीन याने त्याचा खून करण्याचा प्लॅन केला.
नितीन हा मित्राच्या कारमधून त्याला रांजणी पंढरपूर या निर्मनुष्य रस्त्यावर घेऊन गेला. खुनाच्या उद्देशाने पहिल्यांदा घेऊन गेल्यानंतर त्याचा प्रयत्न फसला मात्र या प्रकरणाचा मात्र त्याच्या मनातील हेतूचा अभिमान याला अंदाज आला नाही त्यानंतर गावातील आठवडे बाजाराच्या वेळी रात्री नऊच्या सुमारास नितीन याने त्याच्या भाच्याला बोलावून घेतले आणि नितीन , त्याचा भाचा आणि सावकार हे तिघे दुचाकीवर बसून रांजणी गावाच्या वनविभागाच्या जागेत गेलेले होते. तिथे गेल्यानंतर नितीन याने अभिमान मेटकरी याच्या डोक्यात लोखंडी पट्टीने वार केला त्यानंतर पुन्हा दोघेही आपल्या गावी परतलेले होते.
मयत व्यक्तीच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली त्यानंतर तपासात प्रगती झाली नाही म्हणून अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आलेला होता . पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या बारा तासात तपास वर्ग झाल्यानंतर कारवाई केलेली असून नितीन याने अभिमान मेटकरी याने पैशाच्या वसुलीसाठी अत्यंत घाण घाण शब्दात आपल्या कुटुंबीयांबद्दल वक्तव्य केलेले होते त्यामुळे त्याचा खून केलेला आहे याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर , पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर , स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार मुजावर यांनी याप्रकरणी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. तपास वर्ग झाल्यानंतर अवघ्या बारा तासात खुनाचा छडा लावल्याबद्दल पथकाला प्रशस्तीपत्रक देखील देण्यात आलेले आहे.