ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे यारीद्वारे अवैध वाळू उपसा करणान्या दोन वाळू पॉइंटवर कारवाई करून दोन ट्रॅक्टरहेड यारी मशीन, एक टेम्पोट्र्क वाहन व वाळू साठ्यासह एकूण १६ लाख १२ हजार हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रात छापा टाकला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशीन जोडून भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. तेथून १९ इसमांना ताब्यात घेतले. तसेच दुसऱ्या वाळू पाईटवर छापा घालून चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही वाळू पॉइंटच्या ठिकाणाहून दोन ट्रॅक्टरहेड, दोन यारी मशीन संच एक वाळूने भरलेला टेम्पोटक असा एकूण १६ लाख १२ हजारांचा मुदेमाल जप्त करण्यात आले,
राहुल भीमा जाधव, लक्ष्मण गोरख माने, सागर बाबासाहेब जाधव, युवराज राजाराम माने (चौघे रा. जाधव वस्ती वेळापूर), रोहन बबन बाबर, मंगेश मच्छिंद्र भोसले, सागर बाबूराव माने, समाधान सत्यवान आठवले (चोघे रा. सरकोली), आनंद मारुती पांढरे, संदीप अंकुश पांढरे, धनाजी मारुती खाडे (तिघे रा. शंकरगाव), पॉईंट फरार मालक धनाजी दत्तात्रय उर्फ बापू भोसले (रा. सरकोली) तसेचआकाश सुधाकर माने, सोमनाथ भारत जाधव, गणेश अशोक माने, प्रदीप भारत जाधव (सर्व रा. जाधववस्ती वेळापूर), पॉइंट चालक फरार नितीन धोंडिराम भोसले (रा. सरकोली), शेतमालक फरार पांडुरंग ज्ञानेश्वर भोसले (रा. सरकोली) यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक फौजदार खाजामुजावर, विराजी पारेकर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले यांनी केली.