ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतताच बंगळूरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार आहेत.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे. दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चे लँडिंग मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून लाईव्ह पाहिले. त्यानंतर मिशन यशस्वी होताच इस्रो प्रमुखांशी मोदींनी फोनवर संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 मिशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून संवाद साधताना इस्रो प्रमुखांना भेट देण्यासंदर्भात शब्द दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, भारताची यशस्वी चंद्रमोहीम ही केवळ आमच्याच देशापुरती नव्हती. वसुधैव कुटुंबकम ही भारताची भूमिका आहे. मानवजातीला केंद्रीभूत मानून चंद्रयान-3 मोहीम आखण्यात आली होती.
त्यामुळे चंद्रावर भारताने ठेवलेले पाऊल हे यश साऱ्या मानवजातीचे आहे. दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 सुखरूप उतरताच सोशल मीडियाच्या जगतातही भारताने इतिहास रचला. चंद्रयान-3 च्या ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ने जागतिक विक्रम मोडला. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लँडिंग होताना बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी तब्बल 80 लाख 59 हजार 688 जणांनी लाइव्ह सोहळा पाहिला.