पंतप्रधान नरेंद्र मोदीआज (9 एप्रिल) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. ते आज बांदीपूर नॅशनल पार्कसह मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. ते कर्नाटकला रवाना झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जंगल सफारीसाठी खास लूक केला आहे. या नव्या लूकमध्ये पंतप्रधानांनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज यासह एका हातात स्लीव्हलेस जॅकेट दिसत आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन होणार
म्हैसूरमधील ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन केलं जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी प्रथम चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देतील. यावेळी पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही पंतप्रधान भेट देणार आहेत.