राखी पौर्णिमा सण तसेच मार्कंडेय रथोत्सव निमित्त भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य आ.प्रणिती शिंदे यांनी पदमशाली समाजाचे कुलदैवत श्रीमार्कंडेय महामुनी रथोत्सव निमित्त श्री मार्कंडेय मंदिर येथे दर्शन घेऊन प्रार्थना केली की, पूर्व विभागाचा विकास होऊ दे, विडी यंत्रमाग उद्योगातील बांधवांच्या अडचणी दूर होऊ दे, गैस सिलेंडरचे दर आणि महागाई कमी होऊ दे, युवकांच्या हाताला रोजगार मिळू दे, सोलापुरवासीयांना पिण्यासाठी, मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळू दे, सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धि नांदू दे, पदमशाली समाजाची भरभराट होऊ दे, आजपर्यंत जनतेची सेवा केली यपुढेहि असेच जनसेवा करण्याची संधी मिळू दे म्हणत सर्व पदमशाली समाजबांधवांना श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी श्री मार्कंडेय रथोत्सव निमित्त धसका आणि पद्मसेना या विशेषांकाचे प्रकाशन ही आ. प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, समाजाचे विश्वस्त नरसप्पा ईप्पाकायल, महांकाली येलदी, मुरलीधर अरकाल, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, विनोद भोसले, मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, पदमशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट मनोहर माचर्ला, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, देवाभाऊ गायकवाड, जीतू वाडेकर, सुनील सारंगी, श्रीकांत वाडेकर, नागेश बोमडयाल, सुभाष वाघमारे, आदि उपस्थित होते.