लातूरातील दयानंद महाविद्यालय, आयटीआय महाविद्यालयासह 14 केद्रावर पुन्हा कोविड-19 लसीकरण केंद्र लातूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत.चीन, जपान, इतर कांही देशांमध्ये कोविड-19 आजाराचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचे काम वाढविणे प्राधान्याने प्रिकॉशन डोसचे काम वाढविणेच्या सुचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने नागरीकांना माहित असलेले दयानंद महाविद्यालय, आयटीआय महाविद्यालय येथील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र 30 डिसेंबर पासून परत चालू करण्यात येत आहेत. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. ज्या नागरीकांनी त्यांचा कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही. किंवा ज्यांनी दुसरा डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होवूनही त्यांचा प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) अद्याप घेतलेला नाही विशेषतः 60 वर्षावरील नागरीकांनी, रक्तदाब, मधुमेह, गंभीर आजार असणार्या रुग्णांनी त्यांचा प्रिकॉशन डोस प्रलंबीत असल्यास त्यांनी आपले लसीकरण त्वरीत करून घ्यावे. असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कोविड-19 लसीकरण केंद्रामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मनपा रुग्णालय, पटेल चौक प्रा. ना.आ.केंद्र, इंडिया नगर, प्रा. ना.आ.केंद्र, गौतम नगर, (खनी भाग), प्रा. ना.आ.केंद्र, प्रकाश नगर, (मनपा शाळा क्रं. 24 जवळ ), प्रा. ना.आ.केंद्र, मंठाळे नगर, (मनपा शाळा क्रं. 9 जवळ ) प्रा. ना.आ.केंद्र, राजीव नगर, (बाभळगाव रोड ), प्रा. ना.आ.केंद्र, बौद्ध नगर , (यशवंत शाळा, नांदेड रोड जवळ), प्रा.ना.आ.केंद्र, तावरजा कॉलनी प्रा.ना.आ.केंद, साळे गल्ली (यशवंत विद्यालय, गंजगोलाई ), दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड, लातूर, आयटीआय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...