नाथषष्टी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कालाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सूर्यास्त समयी ठीक ६ वाजून ४५ मिनिटांनी शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या मजल्यावरील मनाची काला दहीहंडी नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थिती संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाची बाहेरील डोम मधील कालादहीहंडी ज्ञानेश्वर महाराज या वारकरी भाविकाच्या हस्ते फोडून नाथषष्टी यात्रा उत्सव २०२३ ची सांगता करण्यात आली.
यावेळी न्यायाधीश भावसार, न्यायाधीश भांगे,न्यायाधीश सौ रोकडे,उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेऊल, तहसीलदार शंकर लाड,मुख्याधिकारी संतोष आगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे सह दोन्ही दहीहंडी सोहळ्याला जवळपास पंचवीस हजार भाविक भक्त उपस्थित होते. दिनांक १३ मार्च पासून श्री संत एकनाथ महाराज नाथषष्टी उत्सवाला सुरुवात झाली होती. या यात्रा उत्सवात देशातून तसेच राज्यातील विविध भागातून १ हजार दिंड्या व जवळपास ७ लाख भाविक भक्तांनी आपली हजेरी लावली होती. तीन दिवसांत गोदावरी वाळवंटा सह पैठण नगरीत नाथ नामाचा जयघोष दुमकत होता.
नाथसागरावर शाहीस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. वारकऱ्यांना अक्षदा वाटप,नाथ वंशजांची मनाची दिंडी, छबिना उत्सव आणि आता कालाष्टमी निमित्य नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी तसेच हभप रघुनाथबुवा पालखीवाले यांच्या दोन स्वतंत्र दिंडी मंदिरात नेण्यात आल्या यावेळीभाविक भक्तांनी हरिनामाचा ठेका धरून फुगडीचा आनंद घेतला शेवटी सूर्यास्त समयी नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्याहस्ते कालादहीहंडी फोडून नाथषष्टी यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री पटेल, माजी आमदार वाघचौरे,माजी जिप अर्थ व बांधकाम सभापती विलास बाप्पू भुमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे,दत्ता पाटील गोर्डे,माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,रवींद्र पाटील काळे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ,व्यापारी महासंघाचे पवन कुमार लोहिया,नाथवंशज हरीपंडित महाराज गोसावी,पुष्कर महाराज गोसावी, योगीराज गोसावी, सरदार महाराज गोसावी,मधुसूदन महाराज गोसावी समस्त नाथवंशजा सह अभियंता अरुण गायके,स्वच्छता प्रमुख अश्विन गोजरे, लक्ष्मण औटे, विशाल पोहेकर,राजेंद्र पन्हाळकर,अतिष बारे, गणेश बारे ,पाटीलबा घुले,अशोक पगारे,गणेश सानप, शिवाजी करके, राजू सोनवणे, राम कंदवाने, राजू पगारे सह हजारो भाविक भक्त यावेळी उपस्थित होते. मंदिर परिसरात नाथवंशजात यावेळी थोडी शाब्दिक चकमक झाली होती.