Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मराठा समाजाचा रक्तरंजित इतिहास रणभूमीवर जागृत – ह भ प बंडातात्या कराडकर 

तरुण भारतbyतरुण भारत
February 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – पानिपत हरियाणा या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी रणभूमीवर जाऊन युवकांमध्ये राष्ट्रप्रेम व आपल्या पूर्वजांनी गाजविलेली रणभूमी यांचे दर्शन २२ व २३ फेब्रुवारी रोजी पानिपत हरियाणा या ठिकाणी करण्यात आले.

पुण्यापासून सुमारे १८०० की. मी चा प्रवास करून संघटनेचे युवक पानिपत या ठिकाणी हजर झाले. पानिपत हे ठिकाण सद्य स्थितीत जिल्हाचं असून याचं ठिकाणी १७६१ साली अहमदशहा अब्दाली व मराठे यांच्यामध्ये  युध्द झाले होते. अगदी निकराच्या झालेल्या या लढाईत शेवटच्या क्षणी मराठ्यांचा पराभव झाला होता. मात्र या पराभवाने खचून न जाता पुन्हा काही दिवसांनी मराठ्यांनी हा सर्व परिसर म्हणजे अगदी काबूल, कंदाहार पर्यंत जिकूंन आपल्या पराभवाचा वचपा काढला होता.

या वेळी या दोन दिवसीय कार्यक्रमात प्रमोद भापकर व ह भ प बंडातात्या कराडकर यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून युवकांना समरभूमीचे वर्णन सांगितले. यावेळी अगदी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून ते पानिपत युद्ध कुणामुळे व कश्यासाठी लढले गेले यांचे वर्णन आपल्या व्याख्याच्या माध्यमातून व्यक्त केले.

पहिले बाजीराव पेशवे,विश्वासराव पेशवे, मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे,तुकोजी होळकर, त्र्यबकराव मामा, यशवंतराव पवार, इब्राहिम खान गार्दी, समशेर बहादूर व दत्ताजी शिंदे यांनी अतिशय अतुलनीय पराक्रम करून ही रणभूमी गाजविली होती. महाराष्ट्रातून जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्ध करणारे हे योद्धे आपली प्रेरणा असून त्यांनी अर्पण केलेलं त्यांच्या मृत्युचं व शौर्याचे बलिदान आजही आपणास प्रेरणा देत आहे. इतिहास केवळ वाचून न पाहता त्या ठिकाणी जाऊन त्या क्षात्रतीर्थ ठिकाणचे दर्शन आपण घेतलेच पाहिजे. यावेळी बोलताना ह भ प. बंडातात्या कराडकर यांनी युवकांना केवळ व्यसनमुक्तीचे धडे न देता छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे व त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे आचरण करण्याचे एक धाडस या युवकांमध्ये तयार केले आहे. यावेळी माळशिरस, भोर, सातारा, दौंड, बारामती, कोरेगाव, अहिल्यानगर, माण, पुरंदर, कराड, सांगली, या भागातील सुमारे २०० युवक या उपक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी पानिपत या ठिकाणी असलेल्या स्मारकाचे पुजन करून मानवंदना देण्यात आली. पानिपत येथील रामनारायण मराठा यांनी युवकमित्र बंडातात्या कराडकर व प्रमोद भापकर यांचा सन्मान करून सर्वांचे रुणनिर्देश व्यक्त केले. आजही हरियाणा भागात सुमारे दहा लाख मराठा समाज अस्तित्वात असून त्यातील काही सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रातील इतिहास कार व राजे महाराज तसेच अनेक भागातील युवकांच्या सानिध्यात असून या शौर्य भूमिस आपण सर्वांनी नतमस्तक होण्यासाठी एकदा तरी नक्की भेट द्यावी असे उदगार रामनारायण मराठा यांनी व्यक्त केले.

Post Views: 63
Previous Post

हरियाना सरकारच्या धर्तीवर राज्यातील जेष्ठ नागरिकांना पेन्शन चालू करावी

Next Post

प्रत्यक्ष स्वच्छतेतून राष्ट्रसंत गाडगेबाबांना मानवंदना!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रत्यक्ष स्वच्छतेतून राष्ट्रसंत गाडगेबाबांना मानवंदना!

ताज्या बातम्या

गोकुळच्या ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी तलावात उड्या मारल्या

June 10, 2026

निर्मिती विहार मध्ये ७४ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून #solapurnews #viral

June 10, 2026

सोलापुरात आनंदाने काम करू शकलो कुमार आशीर्वाद

June 10, 2026

गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायदयाचे आशा वर्कर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण द्या जिल्हाधिकारी

June 10, 2026

आता अपघात स्थळी वेगाने येणार अँम्ब्युलन्स ;जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा आदेश

June 10, 2026

नुमवि शाळेत विविध विषयांच्या पाट्या घेऊन मुलांचे केले स्वागत

June 9, 2026
MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902562

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697